सारथी कडून पिरंगुट क्षेत्र, मुळशी तालुक्यातील 200 दैनंदिन मजुरीवर आधारित कामगारांना अन्नधान्याचा वाटप.
सारथी - म्हणजेच मूलभूत रेशन नसलेल्या प्रत्येकांचे मित्र.
या संस्थापना कडून पिरंगुट क्षेत्र, मुळशी तालुक्यातील 200 दैनंदिन मजुरीवर आधारित कामगारांना यशस्वीरित्या किट आतापर्यंत देण्यात आले असे सारथी संस्थापनांचे संस्थापक शुभम लड्ढा, नियती मेहता, सुदर्शन लड्ढा आणि मैत्रेय शाह या सर्वांनी सांगितले.
मूलभूत रेशन नसलेल्या दैनंदिन मजुरीवर आधारित कामगारांना प्रत्येकास मदत प्रदान करणे हे ध्येय ठेवून सारथी संस्थापना 2 किलो आटा, 2 किलो तांदूळ, 500 ग्रॅम तेल, 500 ग्रॅम डाळचा समावेश असलेले 2 आठवड्यांपर्यंत मूलभूत गरजा पूर्ण करणारे राशन किट पुणे शहर आणि आसपास देत आहेत.
पुणे किंवा पुणे परिसरात अन्नधान्य विषयी काही मदत लागली किंवा सार्थीशी काही संपर्क साधण्या साठी shubham@lenoragroup.in वर मेल करू शकता.
ऑनलाइन देणगी आपण 9158481199 (नियती मेहता) या नंबर वर गूगल पे / पेटीएम मार्गे करू शकता.
Comments are closed.