पुस्तकप्रेमींसाठी आनंदाची बातमी!
दि. १४ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मैदानावर आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सव’ तुमच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहत आहे. दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत चालणार्या या महोत्सवामध्ये विविध प्रकाशनांची पुस्तकांची मोठी पर्वणी अनुभवण्याची संधी आहे.
सुनिधी पब्लिशर्ससह सायन पब्लिकेशन्स, सेज पब्लिकेशन्स, पेंग्विन रँडम हाऊस, हार्पर कॉलिंस, वेस्टलँड, अपरांत प्रकाशन इत्यादी प्रसिद्ध प्रकाशकांच्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शित केले जाणार आहेत.
सुनिधी पब्लिशर्सच्या दालनात, नऊ दिवसांमध्ये लेखकांशी संवाद साधण्याची आणि विविध उपक्रमांचा लाभ घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. आपल्या आवडीच्या पुस्तकांसोबतच विचारांची आणि आनंदाची देवाणघेवाण करायला इथे नक्की या.
टीम सुनिधी पब्लिशर्स तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. चला, पुस्तकप्रेमाच्या या उत्सवात सहभागी व्हा आणि तुमचे घर व नातेसंबंध पुस्तकांच्या श्रद्धेने समृद्ध करा.