3 मे पर्यंत लॉकडाऊन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली दि १४ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन ३मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ”देशातील अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच अनेक नागरिकांनीही भारतातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देश ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात येत आहे.’देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘तुम्हा सर्वांच्या त्यागामुळेच भारत आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात यशस्वी झाला.त्यामुळेच कोरोनाविरोधात भारताची कोरोनाशी लढाई मजबूत आहे. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे.’
नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘कोरोनाचं वैश्विक संकट आहे त्यामध्ये कोणत्याही देशाशी तुलना करणं योग्य नाही. पण जर जगभरातील मोठ्या देशांतील कोरोनाचे आकडे पाहिले तर त्यांच्या तुलनेत भारत फार चांगल्या परिस्थितीत आहे. महिन्या भरापूर्वी अनेक देश कोरोनाच्या आकड्यांमध्ये भारतासोबत होते. पण आता त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने जर वेळीच कठोर निर्णय घेतले नसते तर आज भारताची परिस्थिती काय असती, याची कल्पनाही करवत नाही. सोशल डिस्टंन्सिंग आणि लॉकडाऊनचा फार मोठा फायदा देशाला झाला आहे.
Source: https://zunzar.in
Comments are closed.